(Wix-Logo) Create a site!
100s of templates
No coding needed
Start now >>

*** शालार्थ : ओळख ***

शालार्थ प्रणाली ही महाराष्ट्र शासनाने आपल्या विविध विभागांप्रमाणे(सामाजिक न्याय,आदिवासी विकास,उच्च व तंत्र शिक्षण)शालेय शिक्षण विभागाच्या वेतनासंबंधी  एकीकृत वित्तीय प्रबंधन प्रणाली (INTEGRATED FINANCIAL MANAGEMENT SYSTEM) अंतर्गत TATA CONSULTANCY SERVICES च्या सहायाने शालेय शिक्षण विभागात अंतर्भूत करण्यासाठी विकसित केली आहे.  सर्व कर्मचारी व त्यांचे वेतन यांचा एक सामाईक डेटाबेस असावा हा यामागील महत्वाचा हेतू........ "सेवार्थ " या प्रणालीच्या यशानंतर शालार्थचा विकास झाला.सुरवातीला महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांमध्ये  प्रायोगिक तत्वावर हि प्रणाली वापरली जाणार आहे. ठाणे ,पुणे, मुंबई ,लातूर या जिल्ह्यांमध्ये तिच्याविषयी प्रशिक्षणाच्या  माध्यमातून चर्चा सुरु झाल्या आहेत. ही कागद विरहित वेतन देयक निर्माण करणारी प्रणाली अनेक दृष्टीने उपयोगी ठरणार आहे.

शालार्थ(shalarth)-फायदे

१. देयक निर्मिती , देयक प्रस्तुतीकरण ,देयक लेखापरीक्षण ,कर्मचारी वेतन या सर्व गोष्टी इलेक्ट्रोनिक माध्यमातून होणार आहेत.​​

२. वितीय शिस्त निर्माण होण्यास मदत होणार आहे.
3.वेतन निश्चित तारखेला मिळेल.
४.प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळणे अपेक्षित आहे.

५.वेतनाची  लांबलचक चालणारी प्रक्रिया अचूक आणि आटोपशीर होण्यास मदत
६. maker -checker  या तत्वावर हि प्रक्रिया उभी आहे.
७.अचूक देयके निर्माण होतील.
८.वेतनाचा इतिहास अगदी सहज उपलब्ध होईल.
९.कर्मचारी महाकोश निर्माण होईल.
१०.कर्मचारी वेतन TREASURY NET व BEAMS(BUDGET ESTIMATION, AUTHORIZATION & MONITORING  SYSTEM) या वेतन प्रणाली मध्ये विनिमित होणार..

शालार्थ (shalarth) म्हणजे नक्की काय तर आधुनिकरणाची झालर पांघरलेली पारंपारिकच वेतन प्रणाली... ONLINE SMART  SYSTEM ...
T -20च्या भाषेत हि प्रणाली थोडक्यात खालील प्रमाणे :


1. प्रथम जबाबदार व्यक्तीच्या (मुख्याध्यापक) नावाने शाळा तयार करावी.
2. शाळा तयार झाल्या नंतर ती शिक्षणाधिकारीकडे मान्यतेसाठी जाईल.
3. ते ती मान्य करतील आणि संचिता संख्येनुसार शाळेला शिक्षकांची पदे देतील.
4. आता शाळेला शिक्षक मिळाले ,त्यांची सर्व माहिती (EMPLOYEE CONF .FORM ) आपल्याला भरावी लागेल. हि माहिती भरून ती पुन्हा शिक्षणाधिकारीकडे जाईल.
5. ते प्रत्येकाची माहिती तपासून हा कर्मचारी आपल्याकडे आहे ;याची खात्री करून घेतील.. आणी मग तो कर्मचारी APPROVE (मान्य) करतील.
6. त्यानंतर प्रत्येकाला आपला एक शालार्थ ID मिळेल.. हा ID आपली SERVICE असेपर्यंत कायमचा राहील.
7. मग त्या ID च्या साह्याने त्यांच्या भत्ते व कपाती(ALLOWANCES,DEDUCTION ,LOANS इ.)यांची माहिती भरता येईल.. अशी शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती भरावी लागेल.
8. आणि त्यांचा पगार तक्त्यासाठी एक GROUP (म्हणजे BILLING GROUP) बनवून शाळेचा PAYROLL बनवता येईल..

(Wix Logo)
This site was created using
Create your own for FREE >>